वाहतूक दळणवळण

मुंबई ते पणजी मार्गावर उद्यापासून एसटीची शिवशाही

मुंबई दि.२१ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्या (२३ डिसेंबर) शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या प्रवासाचे भाडे १ हजार २४५ रुपये इतके असणार आहे.

मुंबई-गोवा मार्गावर गोवा राज्य परिवहन महामंडळाची ‘कदंब’ ही सेवा सुरू आहे. तिचे प्रतिप्रवासी भाडे एक हजार २५० इतके आहे. या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. याचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाईल ॲपवरूनही करता येणार आहे.

ही बस मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता सुटणार असून सकाळी सात वाजता पणजीत पोहोचणार आहे. पनवेल, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी बसला थांबा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *