वातानुकूलित लोकलचे तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून ३८ लाखांहून अधिक दंड वसूल
मुंबई दि.२२ :- जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वातानूकुलीत लोकलचे तिकीट नसणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात केलेल्या कारवाईत मध्य रेल्वेने ३८ लाख ७९ हजार रुपये इतका दंड वसुल केला आहे.
या कालावधीत वातानूकुलीत लोकलमधून प्रवास करणाऱ्या तब्बल २० हजार १०४ प्रवाशांकडे योग्य तिकीट नसल्याचे आढळले. त्यामुळे या प्रवाशांविरुद्ध विना तिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात आली.
जानेवारी महिन्यात ९९५ विना तिकीट प्रवासी आढळून आले. त्यानंतर जून महिन्यात २ हजार ८५८ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. सप्टेंबरमध्ये ३ हजार ५७९ प्रवाशांना पकडण्यात आले तर नोव्हेंबर महिन्यात १ हजार ७२० प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.