रिया चक्रवर्तीच्या भ्रमणध्वनीवर ‘एयू’ नावाने ४४ कॉल – खासदार राहुल शेवाळे
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२१ :- रिया चक्रवर्ती हिच्या भ्रमणध्वनीवर ‘एयू’ या नावाने ४४ कॉल आले होते. ‘एयू’ म्हणजे आदित्य ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले असल्याची माहिती बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना दिली.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. दिशा सालियनच्या गूढ मृत्यूनंतर सुशांतसिंह चा मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात आले होते. आता शेवाळे यांनी लोकसभेत दिलेल्या या माहितीमुळे सुशांतसिंह मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.