सार्वजनिक शौचालयांच्या जागा आणि संख्या निश्चित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
फक्त महिलांसाठी २०० शोचालये बांधणार
मुंबई दि.२० :- मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत २० हजार शौचालये बांधण्यात येणार असून फक्त महिलांसाठी २०० प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत. या शौचालयांसाठी जागा आणि त्यांची संख्या निश्चित करण्याचे आदेश बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभाग कार्यालयांना दिले.
गेल्या आठवड्यात मुंबई सुशोभिकरण प्रकल्पातील काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पांतर्गत मुंबईत २० हजार शौचालये बांधण्याचा, तसेच ती २४ तास स्वच्छ ठेवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर चहल यांनी हे आदेश दिले.
केवळ महिलांसाठी राखीव असलेली किमान २०० प्रसाधनगृहे मुंबईत बांधावीत, सर्व विभाग कार्यालयांनी आपल्या स्तरावर प्रसाधनगृहांची आवश्यक संख्या निश्चित करावी, अशी सूचनाही आयुक्तांनी केली आहे.