ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी
ठाणे दि.२० :- ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना ठाणे सत्र न्यायालयाकडून अटक वाॅरंट जारी करण्यात आले आहे. २०१५ मध्ये बेकायदा गाळ्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान माळवी यांनी सुभाष ठोंबरे यांना मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती.
याप्रकरणी गु्न्हा नोंद झाल्यानंतर, तसेच त्यावर चार्जशीट दाखल झाल्यानंतर न्यायालयाने समन्स पाठवून हजर न झाल्याने हे अटक वाॅरंट जारी केल्याचे समजते. २०१५ मध्ये ठाणे महापालिकेतील वर्धापनदिनी देण्यात आलेले पुरस्कार चुकीच्या व्यक्तींना दिल्याचा आरोप सुभाष ठोंबरे यांनी केला होता.
याच प्रकरणाची माहिती घेत असताना संदीप माळवी यांनी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. तर संदीप साळवी यांनी देखील २०१५ या वर्षी सुभाष ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. माळवी यांच्यासोबत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अविनाश रणखांब आणि इतर पाच जणांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आले आहे.