एसटीच्या ताफ्यात नव्या वर्षांत २०० ‘हिरकणी’ बसगाड्या
मुंबई दि.२० :- राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मार्च २०२३ पर्यंत २०० ‘हिरकणी’ बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत. या बसगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी ‘पुश बॅक’ आसन व्यवस्थाही असणार आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या ४०० ‘हिरकणी’ बसगाड्या असून यापैकी २०० बसची कालमर्यादा संपुष्टात आली आहे.
त्यामुळे या बसगाड्या साध्या बसमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे फक्त २०० हिरकणी बस ताफ्यात राहतील. त्यामुळे महामंडळाच्या सेवेत विनावातानुकूलित ७०० बस दाखल केल्या जाणार आहेत. यापैकी २०० बस हिरकणी असणार आहेत.