नागपूरच्या हिवाळी अधिवेशना नंतर तीन लोकप्रतिनिधी बेळगाव दौऱ्यावर
मुंबई दि.१९ :- गेल्या काही दिवसांपासून उफाळून आलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे तीन लोकप्रतिनिधी बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर हा दौरा होणार आहे.
यात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने यांचा समावेश आहे. स्वतः देसाई यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
सीमाभागातील मराठीजनांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक आणि तातडीने निर्णय घेणार आहे. सीमाभागातील बंधू-भगिनींशी संवाद साधण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर उच्चाधिकार समितीचा समन्वयक मंत्री म्हणून आपण स्वत: चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने यांच्यासह बेळगावला जाणार आहोत, असे देसाई यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे