कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या आणखी चार लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही आता विद्युत इंजिन
मुंबई दि.१८ :- कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या आणखी चार एक्स्प्रेस गाड्या डिझेल इंजिनऐवजी आता विद्युत इंजिनावर धावणार आहेत. मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस रविवारपासून (१८ डिसेंबर), तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल दरम्यान धावणारी डाऊन मत्स्यगंधा एक्स्प्रेस सोमवारपासून (१९ डिसेंबर) विद्युत इंजिनावर चालविली जाणार आहे.
तिरूवअनंतपूरम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी १७ डिसेंबरपासून, तर हजरत निजामुद्दीन ते तिरूवअनंतपूरम दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस १९ डिसेंबरपासून विद्युत इंजिनावर धावणार आहे. तिरूवअनंतपूरम ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस २१ डिसेंबरपासून तर कोचुवेल्ली ते योगनगरी ऋषिकेशदरम्यान धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस २३ डिसेंबरपासून विजेवर धावणार आहे.