शहर अस्वच्छ करणा-यांना आता तिप्पट दंड
ठाणे महापालिका प्रशासनाचा निर्णय
ठाणे दि.१७ :- अस्वच्छता करणाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दंडाच्या रकमेत तिप्पट वाढ करण्यात आली आहे. रस्त्यांवर घाण करणे, कचरा फेकणाऱ्यांकडून सध्या १८० रुपये दंड आकारला जातो. त्याऐवजी आता ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींना सध्या १५० रुपये दंड केला जातो.
त्याऐवजी आता ५०० दंड आकारण्यात येणार आहे. उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून सध्याच्या २०० रूपये दंडाऐवजी एक हजार रुपये दंड तर उघड्यावर शौच करणाऱ्यांकडून ५०० रुपयांऐवजी आता एक हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांद्वारे अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींकडून सध्या १८० रुपये दंड वसुल केला जातो. तो आता एक हजार रुपये करण्यात आला आहे.