महाविकास आघाडीचा मोर्चा तर भाजपचे ‘माफी मागा’ आंदोलन
मुंबई दि.१६ :- राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे उद्या ( १७ डिसेंबर) मोर्चा काढण्यात येणार आहे तर भाजपकडून मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून माफी मागा आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे.
उद्याच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असून मोर्चात महाविकास आघाडीतील शिवसेन, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस (आय) या तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतील, असे अनिल परब यांनी सांगितले.
सुषमा अंधारे यांच्याकडून दैवतांचा अपमान सुरू आहे मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे शांतच आहेत. या सर्व वक्तव्याविरोधात भाजपकडून ‘माफी मांगा आंदोलन’ करणार असल्याचे आशिष शेलार म्हणाले.