राज्यस्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धा महापालिका सुरक्षा रक्षकांस सुवर्ण पदक
केईएम रुग्णालयातील सुरक्षा रक्षक अमित साटम यांचा सुवर्ण पदकाने गौरव
मुंबई दि.१७ :- महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनतर्फे लोणावळा येथे आयोजित केलेल्या ‘शरदचंद्र श्री २०२२’ राज्यस्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धेत बृहन्मुंबई महापालिका सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक अमित सुरेश साटम यांनी ८५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले.
साटम २०१४ पासून बृहन्मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल २०२२ मध्ये पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या १० स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश होता. तर अनेक जिल्हास्तरिय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत त्यांनी विविध पुरस्कार पटकाविले आहेत.