वाहतूक दळणवळण

सुरक्षा तपासणी मोहिमेत एक हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

मुंबई दि.१६ :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय (जुना) महामार्गावर सुरू असलेल्या सुरक्षा मोहिमेअंतर्गत सुरक्षा पथकाने एक हजार १६० वाहनांवर कारवाई केली. ८ डिसेंबर ते १३ डिसेंबरदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली होती.

जुन्या महामार्गावरील ४५ टक्के वाहनचालकांवर सीटबेल्ट परिधान केलेला नसल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. १ ते ७ डिसेंबरदरम्यान समुपदेशन आणि जनजागृती करण्यात आल्यानंतर पथकाने प्रत्यक्षात कारवाईचा बडगा उगारला. पुढील सहा महिने ही सुरक्षा मोहीम सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *