पुस्तक आदान प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील लेखकांचा मेळावा
डोंबिवली दि.१६ :- पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे जानेवारी २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या नियोजित पुस्तक आदान प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने डोंबिवली शहरातील लेखकांचा मेळावा डोंबिवलीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास लेखक आणि अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, व्याख्याते डॉ सच्चिदानंद शेवडे यांच्यासह डोंबिवलीतील लेखक मंडळी उपस्थित होती.
आपल्या शहरातला पुस्तक-आदान प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करू या, असे आवाहन टिळक यांनी केले. तर डोंबिवली शहराने जे जे केले त्याचे सगळ्यांनीच अनुकरण केले हा इतिहास आहे. राज्यात वाचनालये बंद पडत असताना पै फ्रेंड्स लायब्ररी मात्र एकेक शाखा वाढवितत आहे हे निश्चित कौतुकास्पद आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीरीने आता फिरते वाचनालय सुरू करावे, अशी सूचना जोगळेकर यांनी केली.
यावेळी प्रख्यात वास्तुविशारद राजीव तायशेटे यांचा सन्मान करण्यात आला. या मेळाव्यास विद्याधर भुस्कुटे, सुनीता तांबे, डॉ. प्रकाश करमरकर, प्रा. अरुण पाटील, आनंद म्हसवेकर, अंजली खिस्ती, डॉ.क्षितिज कुलकर्णी, निलेश बागवे, विलास सुतावणे,राजाराम अलवी, सुनिता तांबे, डॉ.अनुराधा कुलकर्णी, अरुण हरकरे, डॉ.आनंद सूर्यवंशी, अविनाश सोनावणे, सुनील जावळे, चंद्रशेखर टिळक, पराग वैद्य, दिलीप महाजन, उमा आवटेपुजारी, मनीष पाटील, कांचन जाधव आदी उपस्थित होते.