पोलीस दलातील भरतीसाठी १८ लाख अर्ज सादर
मुंबई दि.१६ :- राज्यातील पोलीस भरतीसाठी आतापर्यंत १८ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सुमारे ५० तृतीयपंथीनीही अर्ज केले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर अशी होती.
मिरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवड या दोन नव्या पोलीस आयुक्तालयांची निर्मिती झाल्यामुळे यावर्षी १८ हजार ३३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करण्यात आला होता. मुंबईतही सात हजार पदांसाठी भरती होत असून पोलीस शिपाई, चालक, राज्य राखीव पोलीस दल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.