वाहतूक दळणवळण

पुलाच्या कामासाठी उद्यापासून रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत शिळफाटा रस्ता वाहतुकीसाठी बंद

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

डोंबिवली दि.१४ :- शिळफाटा रस्त्यावरील देसाई खाडी पुलावर नवीन पूल उभारणीचे काम सुरू आहे. या पुलावर तुळई ठेवण्याच्या कामासाठी उद्यापासून (१५ डिसेंबर) रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत शिळफाटा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे काम १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत रात्री ११ ते सकाळी सहा वेळेत दररोज केले जाणार आहे. या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक रात्रीच्या आठ तासाच्या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करता हे काम सकाळी केले तर या आणि पर्यायी रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने रात्री ११ ते सकाळी सहा वेळेत महामंडळाला देसई पुलावर तुळई ठेवण्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे. गुरुवारी (ता.१५) रात्री ११ वाजल्यापासून हे काम सुरू होणार आहे. दररोज रात्री ११ ते सकाळी सहा वेळेत पुढील गुरुवारपर्यंत हे काम केले जाणार आहे. या कामात अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक विभागाने शिळफाटा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेऊन वाहन चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *