शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना
नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणार
मुंबई दि.१४ :- शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटविणाऱ्या सलोखा योजनेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क नाममात्र १००० रुपये व नोंदणी शुल्क १०० रुपये आकारण्यात येणार आहे.
शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपआपसात वाद होतात. ते मिटविण्यासाठी व समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात एकूण जमिनधारकांची खातेसंख्या ३ कोटी ३७ लाख ८८ हजार २५३ इतकी आहे. एकूण वहिवाटदार शेतकरी १ कोटी ५२ लाख इतके आहेत. शेत जमिनीच्या ताब्यासंदर्भात एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे १३ लाख २८ हजार ३४० इतकी आहे.