इंदू मिलस्थळी उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ४५० फुटांच्या पुतळ्याची प्रतिकृती तयार
मुंबई दि.१४ :- इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साडेचारशे फूट उंचीच्या पुतळ्याची प्रतिकृती तयार झाली आहे. उत्तर प्रदेशातील गजियाबद येथे शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यात हा पूतळा तयार करण्यात येणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी येथे भेट देऊन या भव्य पुतळ्याची जी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे त्याची पाहणी केली. ही प्रतिकृती २५ फूट उंचीची आहे. ही प्रतिकृती समाजातील मान्यवरांना दाखवून त्यांच्या काही सूचना असतील तर त्यानुसार बदल करून हा भव्य पुतळा लवकरात लवकर तयार करण्याची सूचना आठवले यांनी शिल्पकार राम सुतार आणि अनिल सुतार यांना केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या भव्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. शासनाकडून या प्रतिकृतला तातडीने मान्यता द्यावी, तसेच पुतळा उभारण्यासाठचा काही निधीही मिळावा, अशी अपेक्षा शिल्पकार राम सुतार यांनी आठवले यांच्याकडे व्यक्त केली.
याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले.