दिल्लीत दिवसाढवळ्या मुलीवर ॲसिड हल्ला
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.१४ :- दिल्लीत एका १७ वर्षीय मुलीवर दिवसाढवळ्या ॲसिड हल्ला करण्यात आला. द्वारका परिसरात ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दुचाकीवरुन आलेल्या दोन आरोपींनी मुलीवर ॲसिड फेकले. ही सर्व घटना ‘सीसीटीव्ही’त कैद झाली आहे. माझ्या दोन्ही मुली सकाळी एकत्र घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोठ्या मुलीवर ॲसिड फेकले अशी माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली.