पृथ्वी थिएटरमध्ये ‘इप्टा ८० महोत्सव सुरू रविवारपर्यंत विविध नाटके सादर होणार
मुंबई दि.१३ :- इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन या संस्थेच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘इप्टा ८०’ या महोत्सवाला मंगळवारपासून मुंबईत सुरुवात झाली. हा महोत्सव रविवारपर्यंत सुरू राहणार असून महोत्सवात विविध नाटके सादर होणार आहेत. जुहू येथील पृथ्वी थिएटर येथे होणा-या या महोत्सवात मुंबईसह देशभरातील विविध भाषक रंगकर्मी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात उद्या बुधवारी १४ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता ‘तेरे शहर में’ तर रात्री ९ वाजता ‘कैफी और मै’, गुरुवार, १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘भूखे भजन ना होए गोपाला’, तर रात्री ९ वाजता ‘एक और द्रोणाचार्य’, शुक्रवार, १६. डिसेंबर या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ‘दृष्टिदान’ आणि रात्री ९ वाजता ‘शतरंज के मोहरे’ ही नाटके सादर होणार आहेत.
शनिवार, १७ डिसेंबर रोजी ‘कश्मकश’, रात्री ९ वाजता ‘आखरी शमा’, रविवारी १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘काबुलीवाला अँड काबुलीवाला लौट आया’, रात्री ९ वाजता ‘हम दिवाने, हम परवाने’ या नाट्यकृती सादर होणार आहेत.
देशातील २२ राज्यांमध्ये ‘इप्टा’ ही नाट्य चळवळ कार्यरत आहे.