अभिनेते अमोल बावडेकरांचा ‘प्रतिशोध’
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१३ :- सोनी मराठी वाहिनीवर येत्या १६ जानेवारीपासून ‘प्रतिशोध झुंज अस्तित्वाशी’ ही नवी मालिका सुरू होत आहे. अभिनेते अमोल बावडेकर या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. आजवर त्यांनी केलेल्या भूमिकांपेक्षा त्यांची ही भूमिका चाकोरी मोडणारी ठरणार आहे.
बावडेकर साकार करत असलेल्या या भूमिकेचे मालिकेतील नाव ‘ममता’ असे असून त्यांच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री पायल मेमाणे आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? त्याचा सामना त्या कशा करता? ते या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. १६ जानेवारी २०२३ पासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे.