मुंबई आसपास संक्षिप्त
बसच्या अपघातात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात खासगी बसच्या झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी शिकवणी वर्गाची सहल मावळ येथे जात असताना हा अपघात झाला. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम आणि खोपोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते.
वांद्रे कुर्ला संकुल ते ठाणे ‘बेस्ट’ सेवा
मुंबई – बेस्ट उपक्रमाने आजपासून (१२ डिसेंबर) वांद्रे कुर्ला संकुल ते ठाणे अशी वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. सोमवार ते शनिवार या कालावधीत दर अर्ध्या तासाने बस उपलब्ध असणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल ते ठाणे पर्यंतच्या प्रवासाचे भाडे २०५ रुपये इतके असणार आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांची सर्वोच्च न्यायालयात भरतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.