महापालिका प्रयोगशाळेत पाण्याचे १४ निकष तपासले जाणार
मुंबई दि.१२ :- अन्न आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेची दादर येथे प्रयोगशाळा अजयाबत केली जाणार असून या ठिकाणी पाण्याच्या नमुन्यांचे एकूण १४ निकष तपासता येणार आहेत.
महापालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालय मध्ये ही प्रयोगशाळा आहे या प्रयोगशाळेत खासगी गृहनिर्माण संस्थांमधील पाण्याचे नमुने शुल्क आकारून तपासले जाते तसेच जलतरण कलवाच्या पाण्याचे नमुने आणि बांधकाम व्यवसायिकांच्या पाण्याचे नमुने येथे शुल्क आकारून तपासले जातात.
विविध संस्थांकडून तसेच जलतरण तलाव, खासगी बांधकाम व्यवसायिकांकडून पाण्याच्या नमुन्यांचे इतरही निकष तपासले जावेत, अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे ही प्रयोगशाळा आता अद्ययावत केली जाणार आहे.