विमान प्रवासाच्या निर्धारित वेळेआधीच प्रवाशांनी विमानतळावर पोहोचावे
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या सूचना
मुंबई दि.०९ :- विमानतळावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि विमान प्रवास सुरू करण्यापूर्वीची पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या निर्धारित वेळेआधीच विमानतळावर पोहोचावे अशा सूचना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने दिल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल तर निर्धारित वेळेच्या किमान साडेतीन तास आणि देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर निर्धारित वेळेच्या किमान अडीच तास आधी प्रवाशांनी विमानतळावर पोहोचावे असे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत आहे. प्रवाशांच्या गर्दीचे आणि विमान प्रवास सुरू करण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेचे योग्य आणि वेळेत नियोजन करता यावे याकरता प्रवाशांना या सूचना देण्यात आल्या आहेत.