उद्योग व्यापार

उद्योजकांनी बचत कशी करावी? या विषयावर व्याख्यान

डोंबिवली दि.०९ :-टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि सव्यसाची मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ डिसेंबर रोजी सी.ए. संजीव गोखले यांचे उद्योजकांनी बचत कशी करावी? या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सकाळी १० ते १२ या वेळेत टिळकनगर विद्या मंदिराच्या पेंढरकर सभागृहात होणार असून ते सशुल्क आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९८३३१८९७७७‌ या क्रमांकावर हर्षल पानसे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘बालभवन’ येथे चित्र प्रदर्शन

डोंबिवली दि.०९ :- विविध क्षेत्रातील चार कलाकारांनी एकत्र येऊन येत्या १० आणि ११ डिसेंबर रोजी ‘बालभवन’, चिपळूणकर पथ, डोंबिवली (पूर्व) येथे चित्रकलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ज्येष्ठ कलाकार आणि वास्तुविशारद चंद्रकांत सामंत, अंतर्गत सजावटकार सुरेंद्र देसाई, शंतनु सामंत, वल्लरी सामंत यांचा प्रदर्शनात सहभाग आहे. प्रदर्शनाचे उदघाटन माजी नगरसेविका अलका आवळसकर यांच्या हस्ते होणार असून पॅलेट ॲन्ड बियाॅन्ड संस्थेच्या सहकार्याने होणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत खुले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *