ठळक बातम्या

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अडथळा ठरणारी खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

२२ हजार झाडांवर कु-हाड

मुंबई दि.०९ :- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अडसर ठरलेली मुंबई, पालघर आणि ठाणे येथील २१ हजार ९९७ खारफुटीची झाडे तोडण्यास नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने कंपनीची खारफुटीची झाडे तोडू देण्याची मागणी मान्य केली. मात्र पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला काटेकोरपणे पालन करावे लागेल, असेही न्यायालयाने कंपनीची याचिका मंजूर करताना स्पष्ट केले.

सार्वजनिक हितासाठी ही परवानगी दिली जात असल्याचे स्पष्ट करून या खारफुटी तोडल्यामुळे होणारे नुकसानाची भरपाई म्हणून अडीच लाख रोपांची लागवड करण्याची अट न्यायालयाने कंपनीला घातली आहे. दरम्यान डी. एन. नगर – मंडाले ‘मेट्रो २ ब’च्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील नानावटी रुग्णालय ते वांद्रे दरम्यानच्या २४ झाडे कापण्यात येणार आहे. यासाठीचे मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने जाहीर निवेदन प्रसिद्ध केली आहे. नानावटी रुग्णालय ते वांद्रे दरम्यानची झाडे कापली जाणार असून याबाबत नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *