समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा
मुंबई दि.०९ :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची जाहीर सभा होणार असून यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सर्वश्री नितीन गडकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी दिली