आफताब पुनावाला याला कठोर शिक्षा व्हावी – विकास वालकर यांची मागणी
मुंबई दि.०९ :-श्रद्धाला अतिशय क्रूरपणे संपविणाऱ्या आफताब पुनावाला कठोर शिक्षा व्हावी. त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली जावी आणि ते दोषी आढळल्यास त्यांनाही शासन व्हावे, अशी अपेक्षा श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते किरीट सोमय्यांची भेट घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वालकर बोलत होते.
श्रद्धाच्या गुन्हेगारांना कठोर शासन होईल असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दिल्ली आणि वसई पोलीस संयुक्तपणे या प्रकरणी तपास करत असून न्यायालयावर आणि न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचेही वालकर म्हणाले.