ठळक बातम्या

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई, दि. ७ पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी घेतला.

नाहीतर ‘सोमनाथ’चीही ‘बाबरी’ झाली असती – शेखर जोशी

पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी बैठक झाली.

भारतीय रिझर्व बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता?

बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

महाविकास आघाडीचा येत्या १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाची व्हाट्सअप सेवा

तसेच पुणे नगरपालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरु केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

पुणे महानगरपालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसूंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे.
——

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *