ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे निधन
मुंबई, दि.६ ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी मुंबईत अंधेरी येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
सुखटणकर मूळचे गोव्याचे, माशेल गावचे. त्यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
गावी मॅट्रिकच्या परीक्षेचे केंद्र नसल्याने १९५० मध्ये ते परीक्षेसाठी मुंबईला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईत नोकरीची शोधाशोध सुरू केली.
नाहीतर ‘सोमनाथ’चीही ‘बाबरी’ झाली असती – शेखर जोशी
‘माँटेक्स कॉर्पोरेशन’ कंपनीत टंकलेखक, ओरिएन्टल इन्शुरन्स’ मध्ये ते ‘लिपिक’ म्हणून त्यांनी नोकरी केली. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेवेतून ते प्रसिद्धी अधिकारी म्हणून निवृत्त झाले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नोकरी करत असताना ते जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन ‘बी.ए.’ झाले. सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले.
‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव’ पुरस्कार दुर्ग संशोधक आप्पा परब यांना जाहीर
संस्थेच्या संशयकल्लोळ, संगीत शारदा, मृच्छकटीक, होनाजी बाळा, अखेरचा सवाल, दुर्गी, स्पर्श, एकच प्याला, मत्स्यगंधा, लेकुरे उदंड झाली, नटसम्राट आदी नाटकांतून सुखटणकर यांनी भूमिका केल्या होत्या. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधील ‘शिवाजी’ महाराज वगळता सर्व भूमिका त्यांनी केल्या होत्या.
युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील
एकदा ऐनवेळी ‘संभाजी’ साकारला. ‘नटसम्राट’ नाटकातीलही ‘आप्पासाहेब बेलवलकर’ वगळता सर्व भूमिका साकारल्या होत्या. ‘गोवा हिंदूू’च्या विविध नाटकांचे सुमारे अडीच ते तीन हजार प्रयोग त्यांनी केले. संस्थेसाठी ‘कार्यकर्ता’ असल्याने सादर झालेल्या प्रयोगांसाठी मानधन घेणे त्यांना योग्य वाटले नाही.त्यामुळे कोणतेही मानधन न घेता सुखटणकर यांनी हे सर्व प्रयोग केले.
‘जी २० परिषदे’ च्या महाराष्ट्रात १४ बैठका होणार
‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ आदी मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. आकाशवाणी मुंबई केंद्रांवरील अनेक श्रुतिका, नभोनाटय़ यातही ते सहभागी झाले.
पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई दूरदर्शन केंद्रावरील विविध नाटके, ‘गजरा’ या कार्यक्रमात ते होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या निवडक मराठी मालिका तर ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिका.
सुखटणकर यांच्या पार्थिवावर दुपारी पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
—-
उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीप्रकरणी येत्या ८ डिसेंबरला सुनावणी