साहित्य

नाहीतर ‘सोमनाथ’चीही ‘बाबरी’ झाली असती – शेखर जोशी

हिंदुद्वेषी जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधाला न जुमानता भारताचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिराचे पुनःनिर्माण/जीर्णोद्धार केला.

त्यासाठी या दोघांना शतशः दंडवत.

गुजरातमध्ये पुन्हा भाजपच मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज हिमाचलमध्ये चुरस

सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी हा जिर्णोद्धार केला नसता तर तिथेही ‘बाबरी’ उभी राहिली असती आणि या ‘बाबरी’चा पुन्हा ‘सोमनाथ’ करायला किती काळ जावा लागला असता? हे त्या सोमनाथालाच ठाऊक. कोणी सांगावे, कदाचित काश्मीरप्रमाणे सोमनाथही ठुसठसणारी जखम झाली असती.

‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव’ पुरस्कार दुर्ग संशोधक आप्पा परब यांना जाहीर

पण भारताचे सुदैव की तसे काही झाले नाही. हा प्रश्न वेळीच निकालात निघाला.
खरे तर धर्मांध, अत्याचारी मुस्लिम आक्रमकांकडून सोमनाथ किती वेळा उद्ध्वस्त केले गेले, लुटले गेले हे तो इतिहास न विसरता आणि चीड येणारा, मन विषण्ण करणाराच आहे.

राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण

खरे तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तातडीने मुस्लिम आक्रमकांकडून जे जे उद्ध्वस्त केले गेले किंवा बळकाविले गेले त्या त्या वास्तूंची ( यात ताजमहाल नव्हे तेजोमहालय, कुतुबमिनार नव्हे विष्णुस्तंभ,) यासह समस्त हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या काशी, मथुरा आणि अयोध्या या प्राचीन, पौराणिक ठिकाणांचे अभिमानाने पुनर्निर्माण करणे आणि शहरांचीही नावेही बदलणे आवश्यक होते.

युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील

कारण तो हिंदू धर्माच्या अस्मितेवरील घाला होता. पण हिंदूद्वेष्ट्या आणि मुस्लिम लांगूलचालनकर्त्या नेहरूंनी ते केले नाही. त्याची फळे आणि परिणाम आजही भोगावे लागत आहेत.

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोमनाथचे तसे झाले नाही आणि हा प्रश्न तेव्हाच निकालात निघाला नव्हे तर प्रचंड इच्छाशक्ती आणि तळमळीने तो सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच त्यांना सहकार्य करणा-या, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणा-या सर्वांमुळे निकालात निघाला त्या सर्वांना पुन्हा एकदा शतशः दंडवत.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *