सामाजिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

मुंबई, दि. ६ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि लाखो सर्वसामान्य अनुयायांकडून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला होता.‌

नाहीतर ‘सोमनाथ’चीही ‘बाबरी’ झाली असती – शेखर जोशी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन पुष्पचक्र अर्पण केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

गुजरातमध्ये पुन्हा भाजपच मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज हिमाचलमध्ये चुरस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव’ पुरस्कार दुर्ग संशोधक आप्पा परब यांना जाहीर

रामदास आठवले यांचे अभिवादन
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही सायंकाळी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.‌ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी मार्गदर्शन केले.

पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

काँग्रेस प्रदेशाध्यांकडून अभिवादन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे,माजी खासदार हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.

आता कॉंग्रेसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान – प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात
प्रदेश काँग्रेस कार्यालयात अभिवादन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या दादर टिळक भवन कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *