भारतीय रिझर्व बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता?
कर्जाचा ईएमआय वाढणार
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.०५ :- वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह (आरबीआय) रेपो दरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या चलनविषयक आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले जाते.
रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्जदारांच्या व्याजदरांवर होणार असून कर्जाचे ईएमआय वाढणार आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी ‘आरबीआय’ सातत्याने रेपो दरात बदल करत असून गेल्या दीड वर्षांत रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. ‘आरबीआय’ने मे महिन्यापासून रेपो दरात वाढ केली असून रेपो दर सध्या ५.९ टक्क्यांवर पोहोचला आहे.