आता कॉंग्रेसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान – प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.०५ :- ‘भारत जोडो’ यात्रे नंतर आता कॉंग्रेसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले जाणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून याची सुरुवात होणार आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे येत्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवडय़ात काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन होणार आहे.
अधिवेशनात मल्लिकार्जुन खरगे यांच्या पक्षाच्या अध्यक्षपद निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पक्षाध्यक्ष खरगे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबतचा हा निर्णय घेण्यात आला.