मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीतही लवकरच गॅस शवदाहिनी
मुंबई दि.०५ :- मरिन लाईन्स परिसरातील चंदनवाडी स्मशानभूमीत यापुढे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गॅस शवदाहिनी उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्मशानभूमीतील ‘विद्युत दाहिनी’ ही ‘गॅस दाहिनी’मध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे.
या दुरुस्तीच्या कामासाठी ५ ते ७ डिसेंबर या दरम्यान चंदनवाडी विद्युत दाहिनी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या स्मशानभूमीमधील सर्व विद्युत शवदाहिनी पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) शवदाहिनीत रुपांतरीत करण्यात येणार आहेत.