गोखले पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती
मुंबई दि.०५ :- अंधेरीतील गोखले पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने अंदाजित केलेल्या खर्चापेक्षा तब्बल १२ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी या कंत्राटदाराने दर्शवली आहे.
त्यामुळे मूळचे ८४ कोटी ७२ लाखांचे हे काम आता ७४.५६ कोटी रुपयांत होणार आहे. कंत्राटमंजुरीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून, आठवड्यात मंजुरी व कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.