मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उद्याचा मेगाब्लॉक रद्द
मुंबई दि.०३ :- मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उद्या रविवारचा (०४ डिसेंबर) मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (०६डिसेंबर) चैत्यभूमीवर राज्य आणि देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी येत असतात.
हेही वाचा :- मुंबईत ४ डिसेंबर ते २ जानेवारी २०२३ पर्यंत जमावबंदी – १४४ कलम लागू
त्यांची गैरसोय होऊ नयेत म्हणून हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी दर रविवारी नियमितपणे मेगाब्लॉक घेण्यात येतो.