पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई दि.०३ :- ज्येष्ठ शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीत गायक पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षांच्या एप्रिलमध्ये जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असून राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
हेही वाचा :- महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती
नाशिक, पुणे आणि नागपूर या तीन शहरांमध्ये सांगीतिक मैफिली, तसेच नामवंत लेखक, कवी आणि चित्रकार यांच्यासमवेत परिसंवाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने एकूण ४५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.