ठळक बातम्या

महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती

मुंबई दि.०३ :- राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग समुहांनी ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. राज्याचे कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले

हेही वाचा :- मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उद्याचा मेगाब्लॉक रद्द

राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकरी देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, असे लोढा यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा :- राज्यात गोवरचे ७९३ रुग्ण, १८ जणांचा मृत्यू

दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, आयटी, विज्ञान पदवीधारक, मीडिया आणि एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील नोकऱ्या या मेळाव्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *