महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी महापालिकेतर्फे विविध सेवा-सुविधा
मुंबई दि.०३ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणा-या अनुयायांसाठी सेवा- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहयासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात येत आहे.
हेही वाचा :- मध्य रेल्वेच्या पाच विभागांत विनातिकीट प्रवाशांकडून २१८ कोटी रुपयांचा रुपयांचा दंड वसूल
तात्पुरता निवारा, शामियाना, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर तसेच समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
हेही वाचा :- पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणा-या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवा-याची सोय म्हणून सदर परिसरातील महानगरपालिकेच्या ६ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :- महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यकडून व्यवस्थेचा आढावा शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी करून आढावा घेतला. शिवाजी पार्क येथे अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 50 हजार चौ.फूट जागेत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत. येथे आलेल्या अनुयायांची केसरकर यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.