मध्य रेल्वेच्या पाच विभागांत विनातिकीट प्रवाशांकडून २१८ कोटी रुपयांचा रुपयांचा दंड वसूल
मुंबई दि.०३ :- मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या पाच विभागांत एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून २१८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. उपनगरी तसेच मेल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा :- महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती
या कारवाईत एकूण ३२ लाख ७७ हजार विनातिकीट प्रवासी आढळून आले. मुंबई विभागात १३ लाख ४८ हजार विनातिकीट प्रवाशांकडून ७७ कोटी ४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. एप्रिल-नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून १२४ कोटी ६९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता.