राज्यात गोवरचे ७९३ रुग्ण, १८ जणांचा मृत्यू
मुंबई दि.०३ :- राज्यातील गोवर संशयित रुग्णांची संख्या १२ हजार ५७० झाली आहे. शुक्रवारपर्यंत निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या ७९३ असून एकूण आतापर्यंत १८ मृत्यूंची नोंद झाली आहे.
हेही वाचा :- मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उद्याचा मेगाब्लॉक रद्द
राज्यात यंदाच्या वर्षी एकूण ९३ ठिकाणी गोवर उद्रेक झाला आहे. गोवर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात जिल्हा स्तरावर ११ लाख ५५५ हजार ५७० लससाठा उपलब्ध तर विभागीय स्तरावर १ लाख १९ हजार २५० लससाठा आहे.