बेस्ट उपक्रमाची ‘सुपर सेव्हर’ योजना
कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त ३४ टक्के सवलत मिळणार
मुंबई दि.०२ :- बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट चलो ॲप’ आणि ‘बेस्ट चलो कार्ड’ वापरकर्त्यांसाठी ‘सुपर सेव्हर’चा प्लॅन सादर केला आहे. बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो कार्डचा वापर करून प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ३४ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
हेही वाचा :- नागपूर समृद्धी महामार्ग – नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी ९०० रुपये टोल
०१ डिसेंबरपासून ‘चलो ॲप’वर या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असून ३ डिसेंबरपासून चलो कार्डवर ही योजना लागू होणार आहे. प्रवाशांना बेस्ट वाहकाच्या माध्यमातून किंवा प्लॅन खरेदी करून याचा वापर करता येणार आहे.