मुंबईत ४ डिसेंबर ते २ जानेवारी २०२३ पर्यंत जमावबंदी – १४४ कलम लागू
मुंबई दि.०२ :- मुंबई शहरात ४ डिसेंबर ते २३ जानेवारी २०२३ या कालावधीत १४४ कलम लागू केले जाणार आहे, अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शहरात शांतता राहावी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी हा आदेश काढला आहे. या कालावधीत एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत शहरात शस्त्रं, फायर आर्म्स, तलवारी आणि इतर शस्त्रं बाळगण्यास तसेच घोषणाबाजी, निदर्शने यावरही बंदी असणार आहे.