सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई दि.०२ :- सर्वसामान्य नागरिकांकडून प्राप्त होणा-या सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली. केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा :- ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील माहिती दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे येणाऱ्या सार्वजनिक तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग केले जाईल. तक्रारींवर विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात येणार असून सार्वजनिक तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा आपण स्वतः आढावा घेणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा :- जे.जे., जीटी रूग्णालयातील आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी १९ कोटी रूपये मंजूर
आता शासनाच्या प्रत्येक विभागांचे आणि जिल्ह्यांची गुड गव्हर्नन्स रॅंकिंग केली जाणार आहे. शासकीय विभाग आणि जिल्ह्यांच्या प्रशासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांची, सुशासनाची क्रमवारी निश्चित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.