ठळक बातम्या

‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ

मुंबई दि.०२ :- येत्या ३१ डिसेंबरपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई शहर विभागातील या अभियानाचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दादर परिसरातील महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाच्या प्रांगणात झाला.

हेही वाचा :- नागपूर मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील अभियानाचा शुभारंभ पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत वांद्रे पूर्व परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात झाला‌. मुंबई शहरस्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनविण्याचा शासनाचा निर्धार असून हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे केसरकर सांगितले. तर लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या अभियानात सर्व मुंबईकरांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

हेही वाचा :- महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य‌ आणि हार्बर मार्गावर १२ विशेष लोकल फे-या

अभियानाच्या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात स्वच्छतेची संबंधित विविध स्पर्धा, स्वच्छता उपक्रम, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली. ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये विविध ठिकाणी करण्यात आला. यावेळी जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *