ठळक बातम्या

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची अखेर माघार शुक्रवार’ची घोषित केलेली सुट्टी रद्द

हिंदू संघटनांच्या लढ्याला यश

मुंबई दि.०१ :- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या मुंबईतील दादर, गोवंडी येथील शाखांनी ‘१ डिसेंबर २०२२ पासून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ रविवारऐवजी दर शुक्रवारी बंद राहील, असा निर्णय घेतला होता. हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदू संघटना आणि जागृत नागरिकांनी याला विरोध केला. अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया’ने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून हा निर्णय मागे घेतला असल्याचे जाहीर केले.

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने गोवंडी शाखा, दादर शाखा आणि नरिमन पॉईंट येथील मुख्य शाखा या ठिकाणी निवेदन देऊन हा निर्णय रहित करण्याची मागणी केली होती.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या या निर्णयामुळे जनसामान्यांमध्ये बँक मुसलमानधार्जिणे निर्णय घेत असल्याची भावना निर्माण झाली होती. शासन नियंत्रित बँकांमध्ये एका विशिष्ट धर्माला झुकते माप देण्याचा निर्णय घेणे, हे अन्य धर्मीयांवर अन्याय केल्यासारखेच असल्याचे समितीचे म्हणणे होते. शुक्रवारी सुटी जाहीर केली जात आहे, यातून आपण पाकिस्तानात रहातो कि हिंदुस्थानात ?’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ काही शाखांच्या सुट्टीच्या वारांमध्ये बदल करण्याचे नेमके कारण काय ? असे प्रश्न समितीने बँकेला विचारले होते. हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा समितीने दिला होता.

आता बँकेने निर्णय मागे घेतला असला, तरी केंद्र सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी करून असे निर्णय घेणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *