गोवरबाधित रुग्णांचे सात दिवसांचे विलगीकरण
गोवरमुळे आत्तापर्यंत १५ बालकांचा मृत्यू
मुंबई दि.०१ :- गोवर झालेल्या रुग्णांचे शसात दिवस विलगीकरण करण्यात येणार असून त्यांच्यावर तिथेच उपचार करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी दिल्या. दरम्यान राज्यात आतापर्यंत १५ बालकांचा गोवरने मृ्त्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, वसई-विरार, पनवेल, पिंपरी-चिंचवड मालेगाव, औरंगाबाद, बुलढाणामध्ये गोवरची साथ पसरली आहे.
या सर्व ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या ८७७ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे.
गोवरची लक्षणे असल्यास संबंधित बालकांची माहिती तात्काळ आरोग्य विभागास द्यावी, अशा सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.