नागपूर मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग 42 वा टप्पा पूर्ण पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर ते शिर्डी पहिल्या ५२० किलोमीटर टप्पा
मुंबई दि.०१ :- बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे लोकार्पण येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत पार करता येणार आहे.