उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीप्रकरणी येत्या ८ डिसेंबरला सुनावणी
गौरी भिडे यांची जनहित याचिका
मुंबई दि.०१ :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि चिरंजीव आदित्य, तेजस यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जमवली असून त्याबाबत गुन्हे अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) तपास करण्याचा आदेश द्यावा’, या विनंतीच्या फौजदारी जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात ८ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
गौरी भिडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. यापूर्वी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तांत्रिक कारणामुळे सुनावणीस नकार दिला होता आणि हा विषय अन्य योग्य खंडपीठासमोर सुनावणीस ठेवण्याचे निर्देश दिले होते. आता न्या. धीरज ठाकूर, न्या. वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.