मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज ७ प्रवाशांचा मृत्यू
मुंबई दि.०१ :- मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करताना दररोज ७ प्रवासी मृत्युमुखी पडत आहेत. या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत ५७९ प्रवाशांना उपनगरी गाडीतून पडल्याने प्राण गमवावे लागले असल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या उपनगरी गाडीतून, रेल्वे रुळाजवळील खांबांना आपटून खाली पडणे, फलाट आणि उपनगरी गाडीमधील फटीत अडकणे, छतावरुन प्रवास करताना ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या गाडीत चढणे किंवा उतरणे आदी कारणांमुळे प्रवासी
मृत्युमुखी पडत आहे.